शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

शहिदांच्या कुटुंबीयांना जळगावातून आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:36 PM

आर्या फाउंडेशनच्या पुढाकार

ठळक मुद्देकुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट१० शहिदांच्या कुटुंबियांना मदत

जळगाव : देशाचे रक्षण करताना प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांच्या कुटुंबांना आधार मिळावा म्हणून जळगावातून मदतीचा हात दिला जात असून आर्या फाउंडेशन या संस्थेतर्फे श्रीरामपूर, ता.सिन्नर (जि. नाशिक) येथील केशव गोसावी यांच्या कुटुंबियांना ६५ हजार रुपयांची मदत केली. या संस्थेतर्फे या पूर्वीही १० शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आली आहे.देशातील नागरिक सुरक्षित राहावे म्हणून सैनिक सीमेवर अहोरात्र जीवाची बाजी लावून पहारा देत असतात, प्रसंगी त्यांना विरमरणही येते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळावा या भावनेने जळगावातील आर्या फाउंडेशन ही संस्था पुढे सरसावली असून शहिदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ६५ हजार रुपयांची मदत करीत आहे.शहिद केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना आधार११ नोव्हेंबर २०१८ रोजी राजुरी सेक्टर मध्ये नौशेरा भागात शहिद झालेल्या श्रीरामपूर,ता.सिन्नर, जि. नाशिक येथील केशव गोसावी यांच्या कुटुंबियांना जळगावच्या आर्या फाउंडेशनतर्फे ६५ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी आर्या फाउंडेशन नाशिकचे प्रतिनिधी ऋषिकेश परमार यांच्यासह डॉ. प्रभाकर बेडसे, डॉ.श्यामसुंदर झळके, डॉ. सतीश साळुंखे, डॉ. विवेक जोशी, डॉ.योगेश पंजे, डॉ.नितीन शाहीर, डॉ. योगेश पवार उपस्थित होते. यावेळी आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांनीही शहीद जवान केशव यांच्या वडिलांचे सांत्वन केले.कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकटकुटुंबात केवळ वडील आणि शहीद जवानाची पत्नी असून ३ दिवसांपूर्वीच शहीद जवान यांच्या पत्नीला कन्यारत्न प्राप्त झाले. वडील डाव्या हाताने अपंग असून गावातील मंदिराची साफसफाई करून गावकरी देत असलेल्या अन्नधान्यावर उदरनिर्वाह करतात. त्यात एकुलताएक मुलगाही देशासाठी शहीद झाला.१० शहिदांच्या कुटुंबियांना मदतआर्या फाउंडेशनतर्फे संदीप सोमनाथ ठोक (खंडागळी, ता.जि. नाशिक), विकास कुळमेथे (नेरळ, ता.वणी, जि. यवतमाळ), विकास उईके (नांदगाव खंडेश्वर, ता.जि. अमरावती), चंद्रकांत गलांडे (जाशी, ता.माण, जि. सातारा), नितीन सुभाष कोळी (दुधगाव, ता.मिरज, जि. सांगली), सुमेध वामन गवई (लोणाग्रा, ता.जि.अकोला), रवींद्र धनावडे (मोहट मेळा, ता.जि. सातारा), मिलिंद किशोर खैरनार, (रा.म्हसरूळ, नाशिक), योगेश मुरलीधर भदाणे (खलाने ता.शिंदखेडा, जि. धुळे), कौस्तुभ प्रकाश राणे (मीरा रोड, मुंबई)आवाहनाला दात्यांचा प्रतिसादशहीद झालेल्या जवानांची भर निघू शकत नाही मात्र त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळावा म्हणून डॉ. धर्मेंद्र पाटील हे शहिद जवानाचे छायाचित्र व मदतीविषयीचा संदेश सोशल मीडियावर पाठवितात. त्यानुसार त्याला प्रतिसाद देत जळगाव शहरातूनच नव्हे तर राज्यातून व परदेशातूनही दाते सढळ हाताने मदत करीत असल्याचा सुखद अनुभव संस्थेला येत असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले.स्वखर्चाने राज्याच्या कानाकोपºयात मदतीसाठी पोहचतात संस्थेचे पदाधिकारीराज्यात आतापर्यंत नाशिक, अमरावती, यवतमाळ, अकोला, सातारा, सांगली, नंदुरबार, शिंदखेडा, मुंबई, धुळे इत्यादी जिल्ह्यातील शहिद कुटुंबियांच्या घरी आर्या फाउंडेशनचे पदाधिकारी हे स्वखर्चाने मदतीसाठी पोहचतात ही विशेष बाब आहे.देशासाठी प्राणाचे बलिदान देणाºया शहिद जवानांच्या कुटुंबियांना आधार मिळावा या उद्देशाने आपण ही मदत करीत असतो.डॉ. धर्मेंद्र पाटील, अध्यक्ष, आर्या फाउंडेशन

टॅग्स :Jalgaonजळगाव