गरबा पाहण्यासाठी जाणारा बांबरूडचा तरुण अपघात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:47 IST2018-10-14T22:44:22+5:302018-10-14T22:47:07+5:30
मारुती व्हॅन व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन १ जण ठार तर १ गंभीर जखमी झाल्याची घटना पाचोरा - भडगाव रस्त्यावर १३ रोजी रात्री घडली आहे.

गरबा पाहण्यासाठी जाणारा बांबरूडचा तरुण अपघात ठार
पाचोरा : मारुती व्हॅन व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन १ जण ठार तर १ गंभीर जखमी झाल्याची घटना पाचोरा - भडगाव रस्त्यावर १३ रोजी रात्री घडली आहे.
दीनानाथ सुरेश गावडे (रा बांबरुड प्रभ) व राहुल दिलीप पिंगळे (रा. धुळे) हे दोघेजण बांबरुड येथून मोटारसायकलने पाचोरा येथे गरबा पहाण्यासाठी येत होते. या दरम्यान पाचोरा येथून भडगावकडे भरधाव वेगाने जाणारी मारुती व्हॅन (क्रमांक एमएच १९ बीव्ही ९८८२) ही जात असताना समोरासमोर धडक झाली. या अपघातात मोटरसायकलस्वार दीनानाथ गावडे हा जागीच ठार झाला तर राहुल पिंगळे गंभीर जखमी झाला. या दरम्यान मारुती व्हॅन चालक पसार झाला. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.