शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

'चिन्या ' मृत्यू प्रकरणी व्हिसेरा चाचणी प्रक्रियेत लाच देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:16 IST

जळगाव - कारागृहात बंदी असणाऱ्या चिन्या उर्फ रवींद्र जगताप याचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला आहे. त्यांच्या शविच्छेदन अहवालाच्या व्हिसेरा ...

जळगाव - कारागृहात बंदी असणाऱ्या चिन्या उर्फ रवींद्र जगताप याचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला आहे. त्यांच्या शविच्छेदन अहवालाच्या व्हिसेरा चाचणी प्रक्रियेत दोषी असलेल्या कारागृह अधीक्षकासह कर्मचाऱ्यांतर्फे व्हिसेरा चाचणी प्रक्रियेत लाच देऊन फेरफार करण्याचा प्रयत्न संशयितांकडून केला जात असल्याचा आरोप मयताची पत्नी मीनाबाई जगताप यांनी धुळ्याच्या न्याय वैद्यक प्रयोगशाळा भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयाच्या मुख्य अधिष्ठाता यांना दिलेल्या अर्जात केला आहे.

११ सप्टेंबर २०२० रोजी चिन्या उर्फ रवींद्र जगताप याचा जळगाव जिल्हा कारागृहातील अधीक्षक पेट्रस गायकवाड, जेलर जितेंद्र माळी व इतर रक्षक कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत यांनी केलेल्या अमानुष मारहाणीत मृत्यु झालेला आहे. या प्रकरणात संशयास्पदरित्या प्रचंड विलंब होत असल्याने अखेर नाईलाजाने औरंगाबाद खंडपीठात संबंधिताविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासाठी याचिका दाखल केलेली आहे व प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, असे त्यात म्हटले आहे.

शव-विच्छेदन अहवाल व डेथ मेमोची छायांकित प्रत प्राप्त झालेली असून त्यामध्ये स्पष्ट मृत्युचे कारणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. डेथ मेमोमध्ये चिन्याचा मृत्यू कारागृहात झाला असल्याबाबत वेळेसह उल्लेख करण्यात आलेला आहे. इन कॅमेरा शव-विच्छेदन करण्यात आलेले आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत अंतिम व्हिसेरा चाचणी अहवालात संबंधित विभागातील अज्ञात अधिका-यांस लाखोंची लाच देवून फेरफार करण्याचे षडयंत्र योजिले आहे. त्यामुळे तात्काळ या प्रकरणी योग्य ती कारवाई होवून न्याययुक्‍त व पारदर्शक अहवाल द्यावा, अशी मागणी चिन्याची पत्नी मीनाबाई यांनी अर्जातून केली आहे.