शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्ट मागणं बेतलं जीवावर; वाळूच्या डंपरनं दिलेल्या धडकेत दुचाकी घुसली चालत्या बसमध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 13:42 IST

Accident : डंपरसह चालक धीरज मोहन धनगर (१८,रा.कडगाव, ता.जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देहा अपघात मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता इच्छा देवी चौकानजीकच्या सिध्दिविनायक हॉस्पीटलमसमोर झाला. ड्युटीवर जाणाऱ्या अक्षय विजय पाटील या सहकाऱ्याकडे त्यांनी लिफ्ट मागितली.

जळगाव : रेमंड कंपनीत जाण्यासाठी दुचाकीवरुन आलेल्या कंपनीच्याच सहकाऱ्याकडे लिफ्ट मागितली अन‌् अवघ्या एक मिनिटातच मागून भरधाव वेगाने आलेल्या वाळूच्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली व त्यात दुचाकी पुढे चालणाऱ्या एस.टी.बसमध्ये घुसली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले सिध्दार्थ त्र्यंबक मोरे (५७,रा.सिंधी कॉलनी) हे जागीच ठार झाले तर दुचाकीस्वार अक्षय विजय पाटील (३०,रा.शिवम नगर, निमखेडी परिसर) हा तरुण गंभीर झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता इच्छा देवी चौकानजीकच्या सिध्दिविनायक हॉस्पीटलमसमोर झाला. डंपरसह चालक धीरज मोहन धनगर (१८,रा.कडगाव, ता.जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिध्दार्थ मोरे हे रेमंड कंपनीत कामाला होते. रोज सकाळी ड्युटीवर जाण्यासाठी ते घरुन इच्छा देवी चौकापर्यंत चालत यायचे. तेथून कंपनीत जाणाऱ्या ओळखीच्या व्यक्तीच्या दुचाकीवर बसून ड्युटीवर जायचे. त्याप्रमाणेच मंगळवारी ते चालत इच्छा देवी चौकात आले. त्याचवेळी ड्युटीवर जाणाऱ्या अक्षय विजय पाटील या सहकाऱ्याकडे त्यांनी लिफ्ट मागितली. दुचाकीवरुन(क्र.एम.एच.१९ सी.एल.६७७७) पुढे जायला निघताच अवघ्या एका मिनिटात मागून आलेल्या वाळूच्या डंपरने (क्र.एम.एच.०४ जी.ए.३४९२) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात ही दुचाकी पुढे चालणाऱ्या जळगाव-जामनेर बसमध्ये घुसली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मागे बसलेले मोरे जागीच गतप्राण झाले तर दुचाकीस्वार अक्षय याची मांडी फाटली असून छाती व इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली. मोरे यांना जिल्हा रुग्णालयात तर अक्षय याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूtwo wheelerटू व्हीलरPoliceपोलिसJalgaonजळगाव