केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगावात आगमन; गुलाबरावांनी केलं स्वागत
By विलास बारी | Updated: March 5, 2024 16:26 IST2024-03-05T16:25:52+5:302024-03-05T16:26:54+5:30
जळगाव शहरातील सागर पार्कवर अमित शहा हे २५ हजार युवकांसोबत संवाद साधणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगावात आगमन; गुलाबरावांनी केलं स्वागत
जळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जळगाव विमानतळावर दुपारी साडे तीन वाजता आगमन झाले. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन शाह यांचे स्वागत केले. अमित शाह यांच्या समवेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भापजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील जळगावात दाखल झाले आहेत.
नाशिक पोलीस परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनीही स्वागत केले. जळगाव शहरातील सागर पार्कवर अमित शहा हे २५ हजार युवकांसोबत संवाद साधणार आहे. थोड्याच वेळात ते कार्यक्रमस्थळी दाखल होत आहेत.