शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्याकडून आणखी १७ सायकली हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वेगवेगळ्या भागांतून सायकली चोरून त्या कमी भावात विक्री करणाऱ्या गणेश दौलत साबळे (रा. खडका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वेगवेगळ्या भागांतून सायकली चोरून त्या कमी भावात विक्री करणाऱ्या गणेश दौलत साबळे (रा. खडका रोड, भुसावळ) याच्याकडून आणखी १७ सायकली वेगवेगळ्या गावांमधून हस्तगत करण्‍यात आल्या आहेत. आतापर्यंत त्याने पोलिसांना एकूण ३५ चोरीच्या सायकली काढून दिल्या.

शहरात दुचाकी व सायकली चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्याअनुषंगाने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी विजय निकुंभ, प्रफुल्ल धांडे, तेजस मराठे आणि राजकुमार चव्हाण हे बुधवारी २ जून सकाळी ८ वाजता पेट्रोलिंग करीत होते. नेहरू चौकाजवळील कपड्याच्या दुकानासमोर एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत आढळून आली. त्याची चौकशी केली असता, त्याने गणेश साबळे असे नाव सांगितले. कसून चौकशी केल्यानंतर तो सायकल चोर असल्याचे समोर आले व त्याच्याकडून तब्बल १८ चोरीच्या सायकली हस्तगत करण्‍यात आल्या. नंतर त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्‍यात आला.

कुऱ्हा, गोजोरा येथून सायकली ताब्यात

दरम्यान, गेल्या एक वर्षापासून सायकली चोरी करीत असल्याची माहिती तपासात समोर आल्यामुळे पोलिसांनी तपासाला वेग दिला. विजय निकुंभ, तेजस मराठे, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण यांनी चोरट्याला सोबत घेत चोरी केलेल्या दुचाकी हस्तगत करण्याची मोहीम हाती घेतली. कुऱ्हा, गोजोरा तसेच कुऱ्हा तांडा आदी भागातून तब्बल १७ सायकली चोरट्याने पोलिसांना काढून दिल्या. विशेष म्हणजे, या गावांमध्ये ती कमी किमतीत सायकली विकणारी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध झाली होती. आतापर्यंत एकूण ३५ चोरीच्या सायकली त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. तसेच साबळे याला न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी वाढविली आहे.