माशांचे कालवण कुत्र्याने खाल्ले, संतप्त मुलाने केली आईची हत्त्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 12:43 IST2025-05-26T12:43:54+5:302025-05-26T12:43:54+5:30

शिरपूर तालुक्यातील घटना

Angry son kills mother in Dhule due to fish curry | माशांचे कालवण कुत्र्याने खाल्ले, संतप्त मुलाने केली आईची हत्त्या

माशांचे कालवण कुत्र्याने खाल्ले, संतप्त मुलाने केली आईची हत्त्या

धुळे : वृद्ध आईने मासे बनविले असता ते कुत्र्याने खाल्ल्याने संतप्त मुलाने आईला लाकडी दांडक्याने मारहाण करीत ठार केले. ही घटना शिरपूर तालुक्यातील वाठोडे गावात शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली. आवलेस रेबला पावरा (वय २५, रा. खैरकुटी, ता. शिरपूर) असे संशयिताचे नाव आहे.

शिरपूर तालुक्यातील वाठोडे गावामधील ताजापुरी शेतशिवारातील एका झोपडीत टिपाबाई व मुलगा आवलेस पावरा हे दोघे मायलेक राहत होते. शनिवारी रात्री आठच्या सुमारास वृद्धेने आपल्या मुलासाठी मासे बनविले होते. परंतु ते भटक्या कुत्र्याने खाल्ल्याने संतप्त मुलगा आवलेस पावरा याने टिपाबाई यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. या जबर मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आवलेस पावरा याच्याविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. थाळनेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून फरार आरोपी मुलगा आवलेस पावरा याच्या मुसक्या आवळत जेरबंद केले.
 

Web Title: Angry son kills mother in Dhule due to fish curry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.