शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाराज सदस्य दुसऱ्या दिवशीही ठाण मांडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 12:44 IST

तांत्रिक मान्यतांच्या चौकशीची मागणी: ३८ सदस्य विरोधात, दिवसभर सदस्य रूममध्ये अभ्यास

जळगाव : जिल्हा परिषदेच्या सेस व अन्य हेडच्या निधीमध्ये मोठा घोळ झाला असून प्रमा व तांत्रिक मान्यतांची चौकशी करावी, अशी मागणी निधीवरून नाराज गटाने केली आहे़ त्यांनी यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले़ दरम्यान, या सदस्यांनी दिवसभर सदस्य रूमध्ये थांबून सर्व बाबींचा अभ्यास करून ३८ सदस्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन सायंकाळी अधिकाºयांना दिले़जिल्हा नियोजनकडून येणाºया निधीपैकी तीस टक्के निधीतून परस्पर कामे वाटप केल्याचा आरोप या सदस्यांनी केला असून या मुद्दयावरून गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेत वादळ उठले आहे़ या नाराज सदस्यांना पाठिंबा वाढत असून मंगळवारी माधुरी अत्तरदे यांनी पाठिंबा दिला़ शिवाय शिवसेना सदस्य नानाभाऊ महाजन यांनीही निवेदनावर स्वाक्षरी केली़ मंगळवारी लालचंद पाटील, पल्लवी सावकारे, कैलास परदेशी, रवींद्र पाटील, मीना पाटील आदींची उपस्थिती होती़ दरम्यान, प्रशासकीय बाबींवरील आक्षेपांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन अधिकाºयांनी दिले़तारीखच नसल्याचा आरोपया सदस्यांनी मुख्य लेखा व वित्तअधिकारी विनोद गायकवाड यांच्याकडील तांत्रिक मान्यतेच्या फाईली तपासल्या यातील २५ ते ३० फाईलींवर तारीखच नसल्याचे समोर आल्यानंतर आम्ही ते अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिले़ त्यांनी त्रृटी सांगून बांधकाम विभागाला पुन्हा फाईली सादर करण्याचे सांगितल्याचे या सदस्यांनी सांगितले़ या घोळामुळे काही मोठे अधिकारी घरी जातील, असा दावाही या सदस्यांनी केला आहे़---------------------------------सर्वांना निधी दिला : अध्यक्षा पाटीललोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : सर्व ६७ सदस्यांना कमी जास्त प्रमाणात निधी दिला असून निधीवरून नाराज सदस्यांनी केलेले सर्व आरोप अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी फेटाळून लावले आहेत़ निधीच्या मुद्दयावरून आजपर्यंत एकही सदस्य आपल्यापर्यंत आलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे़ निधीच्या मुद्दयावरून सुरू असलेल्या आरोपांबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले़जिल्हा नियोजनकडील सर्व शंभर टक्के निधीचे एकत्रित नियोजन केलेले होे़ते़ ज्या कामांवरून वादळ उठविले जात आहे, मुळात त्या कामांच्या प्र.मा या अध्यक्षांना कामे वाटपाचे अधिकार मिळण्याच्या आधीच्या आहेत़ जे सदस्य आवाज उठवत आहे, त्यांना अतिरिक्त निधी दिलेला आहे़ सत्ताधारी सदस्यांना प्रत्येकी ५० लाख तर विरोधी सदस्यांना तीस लाख असा निधी दिल्याचे अध्यक्षा पाटील यांनी सांगितले़जनसुविधा ५ कोटी ७० लाख , नागरि सुविधा २ कोटी ७५ लाख, अंगणवाडी २ कोटी, शाळा दुरूस्ती ४ कोटी ८५ लाख, तिर्थक्षेत्र ५ कोटी ७० लाख, अंगणवाडी बांधकाम ८ कोटी, प्रा़ आ़ केंद्र दुरूस्ती एक कोटी असे नियोजन असल्याची माहिती अध्यक्षांनी दिली़ कामाची निवड व लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांचा यात समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ शिवाय प्रशासकी मान्यता, कार्यारंभ आदेश अधिकृत असल्याचे म्हटले आहे़ अधिकाºयांना कामे थांबविता येणार नाहीत, थांबविली असली तरी आम्ही अधिकाºयांना देऊ, असे अध्यक्षांनी सांगितले़

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव