शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

अन् दोन्ही मातांच्या चेहऱ्यावर फुलले हसू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागात दोन कमी वजनाच्या बाळांना बुधवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागात दोन कमी वजनाच्या बाळांना बुधवारी जीवदान मिळाले. वैद्यकीय यंत्रणेच्या प्रयत्नांनी बाळांचा जीव धोक्याबाहेर आल्यानंतर मातांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते.

यावल तालुक्यातील फैजपूर येथील रहिवासी असलेले जुबेर खान हे खासगी वाहनचालक आहेत. त्यांच्या बाळाचे (रहेनुमा) वजन जन्मतः १ किलो होते. त्याला श्वास घ्यायला त्रास जाणवत होता. तब्येत खालावत होती. अशा वेळी खासगी दवाखान्यातून बाळाला शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी २१ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले. नवजात शिशु अतिदक्षता विभागात आल्यावर इन्चार्ज डॉ. वृषाली सरोदे यांनी तपासल्यावर लक्षात आले की, त्याच्या फुप्फुसाची वाढ पूर्ण झाली नव्हती. सामान्य वातावरणात जंतुसंसर्ग होऊन जीवाला धोका होता. अशा वेळी तत्काळ अत्याधुनिक उपकरण व यंत्रणेद्वारे बाळ रहेनुमावर उपचार सुरू करण्यात आले.

बाळानेदेखील उपचाराला प्रतिसाद दिला. यावेळी बाळाच्या आई जकियाबी यांना बालशिक्षण देण्यात आले. कांगारू उपचारपद्धती सुरू झाली. यानंतर तब्बल ४३ दिवसांनी २ फेब्रुवारीला बाळाला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी बाळाचे वजन १ किलो ३०० ग्राम भरले होते.

वेळीच मिळाले उपचार

तसेच दुसऱ्या घटनेत, शहरातील असोदा रस्त्यावरील बहिणाबाई चौधरी कॉलनीतील रहिवासी योगेश खैरनार यांच्या कन्येलादेखील वजन कमी म्हणजे १ किलो ४०० ग्रॅम होते. त्यामुळे या बाळालादेखील बाहेरील जंतुसंसर्ग होऊ न देता वेळेवर उपचार करण्याची गरज होती. शासकीय रुग्णालयात बाळाची आई अश्विनी यांनादेखील कांगारू मदर केअर उपचार पद्धतीने बालशिक्षण देऊन बाळाला प्रतिजैविके (अँटिबायोटिक) न देता अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणेद्वारा उपचार करण्यात आले. या बाळालादेखील २ फेब्रुवारी रोजीच डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज वेळी त्याचे वजन १ किलो ६०० ग्राम भरले.