आदर्श माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी अमिता सोमाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 20:58 IST2021-01-27T20:58:21+5:302021-01-27T20:58:49+5:30
जळगाव : आदर्श माहेश्वरी महिला मंडळाचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला असून मंडळाच्या अध्यक्षपदी अमिता सोमाणी यांची सर्वानुमते निवड ...

आदर्श माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी अमिता सोमाणी
जळगाव : आदर्श माहेश्वरी महिला मंडळाचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला असून मंडळाच्या अध्यक्षपदी अमिता सोमाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमात मावळत्या अध्यक्षा मनीषा तोतला यांनी मंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार सोपविला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वालन करून महेश वंदनाने करण्यात आली. त्यानंतर पदग्रहण सोहळ्याला सुीुवात झाली. यामध्ये सर्वानुमते मंडळाच्या अध्यक्षपदी अमिता सोमाणी यांची नियुक्ती करण्यात आली तर सचिवपदी सुवर्णा मुंदडा, कोषाध्यक्ष अरुणा मंत्री, जनसंपर्क अधिकारी पल्लवी तोतला यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमात साऊथ इंडियन थीम ठेवण्यात आली होती. त्यात कथ्थक नृत्य सादर करून सुषमा चापरवाल यांनी उपस्थितांची दाद मिळवून घेतली. सूत्रसंचालन भारती कोगटा, अलका लढ्ढा, सोहनी तोष्णीवाल, नेहा लाठी यांनी केले. या कार्यक्रमात नम्रता काबरा, पुष्पा सोनी, पुष्पा दहाड, किर्ती काबरा, मोनिका कासट, स्वाती जाखेटे, प्रतिभा काबरा, पूजा जाखेटे, भाग्यश्री भैया, सुलभा छपरवाज, मधू तापडिया, सोहनी तोष्णीवाल, सरिता काबरा, अलका लढ्ढा आदींची उपस्थिती होती.