जळगावात मनसेचे सर्व १२ नगसेवक खाविआकडून लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 20:51 IST2018-06-26T20:47:33+5:302018-06-26T20:51:15+5:30
मनसेचे सर्व १२ नगरसेवक हे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्त्वाखाली मनपाची निवडणूक लढणार आहेत, अशी माहिती खुद्द महापौर तथा मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जळगावात मनसेचे सर्व १२ नगसेवक खाविआकडून लढणार
जळगाव : महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे सर्व १२ नगरसेवक हे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्त्वाखाली मनपाची निवडणूक लढणार आहेत, अशी माहिती खुद्द महापौर तथा मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, यामुळे खान्देश विकास आघाडीची ताकद वाढणार आहे.
२०१३ मध्ये मनपाची निवडणूक झाली. त्यावेळी ललित कोल्हे यांच्या नेतृत्त्वाखाली मनसेने निवडणूक लढली होती. जोरदार मुसंडी मारत मनसेचे १२ नगरसेवक निवडून आले होते.
सुरेशदादा यांच्या झेंड्याखालीच निवडणूक लढणार- ललित कोल्हे
सुरेशदादा यांच्या ७, शिवाजीनगर या निवासस्थानी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आम्ही २०१३ मध्ये मनसेच्या तिकिटावर निवडून आलो. गेल्या चार वर्षांपूर्वीच मी मनसेच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या मनसेच्या कोणत्याही पदावर नाही. आम्ही सर्व १२ नगसेवक आता सुरेशदादा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.