भीक मागणाऱ्या १३ वर्षीय गतिमंद मुलीवर शेतात अत्याचार

By विजय.सैतवाल | Updated: January 7, 2024 15:33 IST2024-01-07T15:32:54+5:302024-01-07T15:33:32+5:30

एकाला पोलिस कोठडी : सुभाष चौक परिसरातून मुलीला नेले दुचाकीवर बसवून

Aggressive 13-year-old begging girl raped in farm in jalgaon | भीक मागणाऱ्या १३ वर्षीय गतिमंद मुलीवर शेतात अत्याचार

भीक मागणाऱ्या १३ वर्षीय गतिमंद मुलीवर शेतात अत्याचार

जळगाव : भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून या प्रकरणी वसीम खान कय्युब खान (२५, रा.ममुराबाद, ता.जळगाव) याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सुभाष चौक परिसरातील मंदिराजवळ १३ वर्षीय मतीमंद मुलगी तिच्या नातेवाईकांसोबत शुक्रवार, ५ जानेवारी रोजी भिक मागत असताना वसीम खान कय्युब खान याने या मुलीला बोलावून दुचाकीवर (क्र. एमएच १९ ईएच ५४३१) बसविले. त्यानंतर तिला तो जळगाव-भुसावळ मार्गावरील दूरदर्शन टॉवरजवळील एका शेतात घेऊन गेला व तेथे तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार पीडीत मुलीने नातेवाईकांना सांगितला. त्या वेळी त्यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ही मुलगी गायब झाल्याने सुरुवातीला या मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होता. त्यात नंतर अत्याचार, पोस्को कायद्यान्वये कलम वाढविण्यात येऊन वसीम खान अय्युब खान याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली व खान याला रविवार, ७ जानेवारी रोजी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्या. जे.जे.मोहिते यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील आर.टी. सोनवणे यांनी बाजू मांडली.

Web Title: Aggressive 13-year-old begging girl raped in farm in jalgaon