शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डीबीटी योजनेच्या विरोधात यावल येथे आदिवासी विद्यार्थ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 17:05 IST

डीबीटी योजनेच्या विरोधात जिल्ह्यातील आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी यावल येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयावर सोमवारी धडक मारत भरपावसात ठिय्या आंदोलन मांडले असून घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे.

ठळक मुद्देजिल्हाभरातून पाचशेच्यावर विद्यार्थी एकवटलेसायंकाळपर्यंत आंदोलनस्थळी येणे सुरूचपाऊस असतांनाही आंदोलनस्थळ सोडले नाही.

आॅनलाईन लोकमतयावल, दि.६ : आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना वसतीगृहाच्या खानावळीतूनच आहार देण्याऐवजी विद्यार्थ्याच्या खात्यावर थेट आहाराचे अनुदान (डीबीटी योजना) देण्याबाबात शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात (राज्यव्यापी आंदोलनाअंतर्गत ) तसेच अन्य १५ शैक्षणिक मागण्यासाठी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हयातील आदिवासी विद्यार्थी वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर सोमवारी धडक देत सकाळी अकरा वाजेपासून ठिय्या आंदोलन सुरू करीत शासनाच्या या योजनेला जोरदार विरोध केला आहे. भरपावसात ठिय्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावेळी शासन विरोधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. जिल्हाभरातून सुमारे ५०० विद्यार्थी येथे धडकले असून सायंकाळपर्यंत विद्यार्थी येणे सुरूच होते. विशेष म्हणजे आंदोलकांमध्ये विद्यार्थींनींचा मोठया प्रमाणात समावेश होता.राज्यातील आदिवासी विद्यार्थी वसतीगृहात गेल्या अनेक वर्षापासून कंत्राटदारामार्फत विद्यार्थ्यांना भोजन दिले जाते. त्या एैवजी आता भोजन अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करून त्यांनी स्वत: परस्पर जेवणाची व्यवस्था करावी अशी ही शासनाची डीबीटी योजना आहे. शासनाने ही योजना राबविण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. या योजनेस जिल्हयातील आदिवासी विद्यार्थी वसतीगृहातील विद्यार्थ्यांचा मोठा विरोध आहे. त्यासाठी जिल्हयातील जळगाव, अमळनेर, चोपडा येथील विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी यावल येथे सोमवारी येवून आदिवासी प्रकल्प कार्यालयावर धडक दिली. चार तासांपासून विद्यार्थ्यांनी शासन विरोधी व प्रकल्प कार्यालयाविरोधी घोषणा देत परिसर दणाणून टाकला होता. नंतर आपल्या मागण्यांचे निवेदन प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांना देण्यात आले. निवेदनामध्ये चोपडा वसतीगृहाचा वाढीव कोटा मंजूर करावा, डी. बी. टी. योजना तात्काळ रद्द करावी, यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. यावेळी आंदोलन समितीचे जिल्हा प्रमुख होमा वसावे, तुषार पवार, अ‍ॅड़ जुम्मासिंग बारेला, भारती पराडके या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. फौजदार सुनिता कोळपकर व सहका-यांनी बंदोबसत ठेवला.दरम्यान, दुपारी साडे चार वाजेपर्यंत या आंदोलनासंदर्भात कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच होते. आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करून अधिकारी कार्यालयात होते तर बाहेर विद्यार्थ्यांचा ठिय्या सुरू होता. 

टॅग्स :agitationआंदोलन