शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
2
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
3
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
4
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
5
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
6
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
7
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
8
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
9
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
10
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
11
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
12
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
13
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
14
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
15
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
16
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
17
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
18
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!

मुक्ताईनगरात १७ वर्षांनंतर खडसे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 15:58 IST

जी.जी.खडसे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. १७ वर्षांनंतर एकत्र आलेल्या या मित्रांनी सहकुटुंब स्नेहमेळाव्यात उपस्थिती लावली.

ठळक मुद्देजागविल्या महाविद्यालयीन जीवनाच्या आठवणीमित्रांचा केला व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपग्रुपवर आठवणींसोबतच सुख-दु:ख शेअर करण्याचे निर्णयआपल्याच पत्नी आणि मुलांच्या समक्ष या मित्रांनी आपले अंतरंग मांडून वातावरण कधी हळवे तर कधी हास्याच्या फवाऱ्यांनी अविस्मरणीय बनविले

मुक्ताईनगर, जि.जळगाव : येथील जी.जी.खडसे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. तब्बल १७ वर्षांनंतर एकत्र आलेल्या या मित्रांनी सहकुटुंब स्नेहमेळाव्यात उपस्थिती लावली आणि महाविद्यालयीन जीवनाच्या आठवणी जागविल्या. आपल्याच पत्नी आणि मुलांच्या समक्ष या मित्रांनी आपले अंतरंग मांडून वातावरण कधी हळवे तर कधी हास्याच्या फवाऱ्यांनी अविस्मरणीय बनविले.१९९९-२००२ मध्ये खडसे महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ४ नोव्हेंबर रोजी जुने मुक्ताई मंदिर, मुक्ताईनगर (कोथळी) येथे झाला. पदवी शिक्षणानंतर १७ वर्षांनी सर्व मित्र एकत्र आल्यानंतर सर्वांनी एकमेकांच्या परिवाराची, व्यवसाय, नोकरीबाबत माहिती जाणून घेतली.या बॅचचे जवळपास बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक जण शिक्षण क्षेत्रात, उद्योग-व्यवसाय तसेच पारंपरिक पद्धतीने शेती यशस्वीपणे कार्य करीत आहेत. विद्यार्थ्यानी शिकत असताना घडलेल्या घटनांची माहिती देवून जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळेस सर्वांच्या परिपक्वतेचा अनुभव आला. ज्ञानेश्वर भगत यांनी व्हॉटसअ‍ॅप ग्रुप तयार करून सर्व मित्रांना एकत्र आणले. मित्रांनी आपल्या जीवनात येणारे सुख दु:ख एकमेकांशी शेअर करण्याचे आवाहन केले. निरोगी आरोग्य जगण्यासाठी जीवनात मित्रांची खूप गरज असते. मित्र हे आपल्या जीवनातील अतिशय महत्त्वाचे घटक असतात, असे सांगितले.संपूर्ण दिवसभर मेळाव्यानिमित्ताने लहान मुलांबरोबर मस्ती बालपण जगता आले. या स्नेहमेळाव्यास योगेश पाटील, नितीन सनान्से, शारंदा धांडे, जितेंद्र पाटील, प्रशांत बंडगुजर, किशोर महाजन, रूपाली लोखंडे, रंजना खाचणे, पुरूषोत्तम ठोसे, जयश्री खडके, रामकृष्ण पाटील, विनोद कांडेलकर, पंकज चौधरी, सोनाली सनान्से, प्रवीण नाफडे, रवींद्र सोनवणे, राजू पाटील, मंगला पाटील, देवेंद्र पाटील, विक्की राणे, प्रमोद चौधरी आदी उपस्थित होते.मेळावा यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर भगत, योगेश पाटील, नितीन सनान्से, रामकृष्ण पाटील, राजू पाटील, जितेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयMuktainagarमुक्ताईनगर