पीककर्जाच्या फरकासाठी पंतप्रधानांकडे जाण्याचा सल्ला; जळगाव जिल्हा बँकेतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 06:49 IST2018-08-24T02:07:19+5:302018-08-24T06:49:31+5:30
हताश शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

पीककर्जाच्या फरकासाठी पंतप्रधानांकडे जाण्याचा सल्ला; जळगाव जिल्हा बँकेतील प्रकार
जळगाव : मंजूर पीककर्जापेक्षा पाच हजार रुपये का कमी मिळाले, याची विचारणा करणाºया शेतकºयाला तुला पैसे हवे असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जावे लागेल, अशी थट्टा जिल्हा बँकेच्या एका कर्मचाºयाने केली. त्यामुळे हताश झालेल्या शेतकºयाने बँकेच्या येथील शाखेतच गुरुवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हातातील विषाची बाटली दुसºया कर्मचाºयाने हिसकावल्याने अनर्थ टळला.
शेतकरी मनोज महाजन यांनी सांगितले की, २०१७ मध्ये जिल्हा बँकेच्या एरंडोल शाखेतून त्यांनी ६९ हजार रुपये पीक कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम बँकेतून काढण्यासाठी किसान क्रेडीट कार्ड देण्यात आले. त्यात मंजूर कर्जापेक्षा पाच हजार रुपये कमी मिळाले. ही तफावत नेमकी कशी झाली, याबाबत एरंडोल शाखेत दीड वर्षापासून खेट्या घालूनही महाजन यांना उत्तर मिळाले नाही. त्यामुळे माहिती घेण्यासाठी महाजन जळगावच्या शाखेत आले होते.
पैसे न मिळताच नोंद
महाजन यांनी १२ जून २०१७ रोजी किसान डेबीट व क्रेडीट कार्डच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. एटीएममधून पैसे निघाले नाहीत, मात्र पैसे निघाल्याची नोंद त्यांच्या खात्यावर झाली आहे.