आजारपणाला कंटाळून प्रौढाची रेल्वेखाली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 22:03 IST2019-11-25T22:03:26+5:302019-11-25T22:03:52+5:30
जळगाव : आजारपणाला कंटाळून आनंदा लोटू चौधरी (४८, रा.आव्हाणे, ता. जळगाव ह.मु.पाळधी, ता.धरणगाव) यांनी धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना ...

आजारपणाला कंटाळून प्रौढाची रेल्वेखाली आत्महत्या
जळगाव : आजारपणाला कंटाळून आनंदा लोटू चौधरी (४८, रा.आव्हाणे, ता.जळगाव ह.मु.पाळधी, ता.धरणगाव) यांनी धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी पाळधीजवळ घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आनंदा चौधरी यांचा पत्नीशी घटस्फोट झालेला आहे. चार वर्षापूर्वी आव्हाणे येथील मालमत्ता विक्री करुन ते आई सुंदरबाई यांच्यासह पाळधी येथे वास्तव्याला आले होते. रेल्वे लाईन परिसरातच किराणा दुकान चालवून ते उदरनिर्वाह भागवत होते. सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांनी धावत्या नवजीवन एक्सप्रेससमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आव्हाणे येथीलच एका व्यक्तीने त्यांना ओळखले. जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला आहे.