नागसेन नगरात प्रौढाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 21:50 IST2021-02-05T21:50:49+5:302021-02-05T21:50:49+5:30
जळगाव : रामेश्वर कॉलनी परिसरातील नागसेन नगरात ४४ वर्षीय प्रौढाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ...

नागसेन नगरात प्रौढाची आत्महत्या
जळगाव : रामेश्वर कॉलनी परिसरातील नागसेन नगरात ४४ वर्षीय प्रौढाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपूर्वी घडली. विजय प्रल्हाद पाटील असे मयत प्रौढाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विजय पाटील हे नागसेन नगरात पत्नी व मुलांसह वास्तव्यास होते. एमआयडीसीतील एका कंपनीत ते कामाला होते. दरम्यान, त्यांना दारूचे व्यसन देखील होते. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ते घरी होते. गुरुवारी दुपारी घरात कुणी नसताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी मुलगा बाहेरून घरी आल्यावर त्याला वडील गळफास घेतलेले दिसून आले. त्याने जागीच हंबरडा फोडला. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस कर्मचारी रतीलाल पवार व पवन कुमावत यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.