जळगाव : शहरातून एक वर्षासाठी हद्दपार केलेले असतानाही शहरात वावरणाऱ्या मोहसीनखान नुरखान पठाण उर्फ शेंबड्या (२६, रा.पिंप्राळा हुडको) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री सागर पार्क परिसरात पकडले. १७ जुलै पासून तो हद्दपार आहे.त्याला रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. प्रितम पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील व रमेश जाधव यांनी ही कारवाई केली.
हद्दपार असतानाही शहरात वावरणाऱ्या आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 20:43 IST