शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

शिंदेंच्या शिवसेना आमदाराच्या वाहनाला अपघात; जखमी चंद्रकांत पाटलांवर रुग्णालयात उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 7:21 PM

Shivsena MLA Accident: आमदार पाटील यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षकांची गाडी त्यांच्या वाहनावर आदळल्याने हा अपघात झाला आहे.

Chandrakant Patil ( Marathi News ) : मुक्ताईनगर मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. या अपघातात पाटील हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार पाटील यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षकांची गाडी त्यांच्या वाहनावर आदळल्याने हा अपघात झाला असून पाटील यांच्यासह तीन सुरक्षारक्षकही अपघातात जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार चंद्रकांत पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह मुक्ताईनगरहून जुना कुंड रस्त्यावर प्रवास करत होते. मात्र वाटेत काही शेतकरी आमदार पाटील यांची वाट पाहात थांबले होते. या शेतकऱ्यांना पाहताच पाटील यांनी आपल्या वाहनचालकाला गाडी थांबवण्याच्या सूचना केल्या. मात्र पाटील यांची गाडी थांबताच त्यांच्या ताफ्यात असलेल्या सुरक्षारक्षकांच्या गाडीला ब्रेक न लागल्याने ती गाडी थेट पुढच्या वाहनावर जाऊन आदळली. या अपघातात चंद्रकांत पाटील यांना किरकोळ जखम झाली आणि तीन सुरक्षारक्षकही जखमी झाले. पाटील आणि इतर जखमींवर रुग्णालयात उपचार केले जात आहे.

दरम्यान, शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख असलेल्या चंद्रकांत पाटील २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तेव्हा भाजपमध्ये असलेले आणि सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असलेल्या एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. मात्र तेव्हा त्यांचा पराभव झाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले, त्यांनी भाजपच्या रोहिणी खडसे-खेवलकर यांचा १ हजार ९८९ मतांनी पराभव केला होता.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेत चंद्रकांत पाटील यांना समर्थन दिले होते. 

टॅग्स :Jalgaonजळगावchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाAccidentअपघात