वऱ्हाडाची गाडी दुभाजकावर धडकली, नवरदेवाला गंभीर दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 10:03 IST2018-05-12T09:58:47+5:302018-05-12T10:03:57+5:30
वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना पारोळा गावाजवळ घडली आहे.

वऱ्हाडाची गाडी दुभाजकावर धडकली, नवरदेवाला गंभीर दुखापत
पारोळा(जळगाव) : वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना पारोळा गावाजवळ घडली आहे. अमळनेर येथून पैठणकडे जाणारी वऱ्हाडाची गाडी पारोळा गावाजवळ दुभाजकावर धडकली. या अपघातात नवरदेवाला गंभीर दुखापत होऊन त्याचा हात व पाय फ्रॅक्चर झाले आहे. समाधान पाटील असे नवरदेवाचे नाव आहे. नवरदेवासहीत अन्य 10 जण देखील जखमी झाले आहेत.
जखमींची नावं
मनीषा दगडू पाटील(२५)
संगीता सोनू पाटील( २४)
अश्विनी प्रविण सूर्यवंशी (१६)
हर्षदा कांतीलाल पाटील(१६)
पियुष दगडू पाटील(६)
स्वप्निल साहेबराव पाटील(३५)
सिमु रविंद्र पाटील(३०)
दगडू साहेबराव पाटील(२०)
कविता समाधान पाटील (३०)
नंदिनी भास्कर देशमुख(६०)
जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात नवरदेवाचा हात व पाय फ्रॅक्चर झाल्यानं त्याला धुळे येथे हलवण्यात आले आहे.