Accident, damage to car in Jalgaon | जळगावातील बहिणाबाई उद्यान चौकात अपघात, कारचे नुकसान
जळगावातील बहिणाबाई उद्यान चौकात अपघात, कारचे नुकसान

जळगाव : रुग्णाला घेऊन जाणाऱ्या कारला भरधाव येणाºया ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणाला मोठी इजा झाली नाही. हा अपघात मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बहिणाबाई उद्यात चौकात झाला.
मंगळवारी सकाळी एका कारमध्ये (क्रमांक एमपी ०४, सीजे ००६६) रुग्णाला घेऊन जात असताना मालवाहू एका ट्रकने या कारला धडक दिली. यात कारच्या मागचा दरवाजा दाबला जाऊन कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणाला इजा झाली नाही. अपघातानंतर कार जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आली व दोन्ही वाहनांचे चालकही पोलीस ठाण्यात पोहचले.

Web Title: Accident, damage to car in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.