त्या अपहृत बालिकेवर संशयिताने केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:13 IST2021-06-04T04:13:24+5:302021-06-04T04:13:24+5:30

बारेला याने २७ रोजी चिकनचे दुकान कुठे आहे, मला दाखवा असे सांगून दहा वर्षीय बालिका व सात वर्षीय बालकाला ...

The abducted girl was tortured by the suspect | त्या अपहृत बालिकेवर संशयिताने केला अत्याचार

त्या अपहृत बालिकेवर संशयिताने केला अत्याचार

बारेला याने २७ रोजी चिकनचे दुकान कुठे आहे, मला दाखवा असे सांगून दहा वर्षीय बालिका व सात वर्षीय बालकाला पळवून नेले होते. या बालिकेचा महिला बालकल्याण समितीने जबाब नोंदविला असता तिने बारेला याने आपल्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. कुठे व कधी अत्याचार केला हे बालिका लहान असल्याने व्यवस्थित सांगता आले नाही.

दरम्यान, बारेला याने पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून त्याने तसेच पीडितेने घातलेले कपडे धुतल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, तो दोघा बालकांना रेल्वेने घेऊन गेला असून, नेमकं कोणत्या गावाला नेले होते, याचा पोलीस तपास करीत आहे. तपास अधिकारी अमोल कवडे यांनी संशयिताला गुरुवारी न्यायालयात हजर केले होते. सरकारतर्फे ॲड.नीलेश चौधरी यांनी बाजू मांडली.

Web Title: The abducted girl was tortured by the suspect