दांडीया खेळताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 18:03 IST2022-10-07T17:57:41+5:302022-10-07T18:03:28+5:30

दांडीया खेळताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

A young man has died due to electric shock while playing dandiya  | दांडीया खेळताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

दांडीया खेळताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

संजय सोनार 

नगरदेवळा (जळगाव) : दुर्गोत्सवात दांडीया खेळताना विजेच्या खांबास स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना नगरदेवळा ता.पाचोरा येथे गुरुवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. समाधान ज्ञानेश्वर महाजन (२१) असे या मृत तरुणाचे नाव आहे. सेंट्रल बँक चौकाजवळील दुर्गोत्सव मंडळात समाधान हा गुरुवारी रात्री दांडीया खेळत होता. अचानक पाऊस सुरू झाला आणि रस्त्याच्या बाजूस असलेल्या विजेच्या खांबास त्याचा स्पर्श झाला आणि काही कळण्याच्या आत समाधान खाली कोसळला.

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने भडगाव रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. गुरुवारी सकाळी अकरा वाजता समाधानवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई व लहान भाऊ असा परिवार आहे. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, नगरदेवळा येथे शुक्रवारी दुर्गा विसर्जन होणार होते, परंतु तरुणाचा मृत्यू आणि पाऊस यामुळे शुक्रवारची विसर्जन मिरवणूक स्थगित करण्यात आली आहे.


 

Web Title: A young man has died due to electric shock while playing dandiya