मुक्ताईनगरजवळ भीषण अपघात; दुधाच्या टँकरला ट्रकची धडक, 5 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 10:10 IST2022-05-13T10:07:50+5:302022-05-13T10:10:02+5:30

Muktainagar Accident News : 3 वाजेच्या सुमारास हा अपघात मुक्ताईनगर शहराजवळील घोडसगाव परिसरात घडला आहे.

A tragic accident near Muktainagar; 5 killed as truck hits milk tanker | मुक्ताईनगरजवळ भीषण अपघात; दुधाच्या टँकरला ट्रकची धडक, 5 जणांचा मृत्यू

मुक्ताईनगरजवळ भीषण अपघात; दुधाच्या टँकरला ट्रकची धडक, 5 जणांचा मृत्यू

जळगाव - जिल्ह्यातील मुक्ताईनगरजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला असून त्यात 5 जण ठार झाले आहेत. आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास हा अपघात मुक्ताईनगर शहराजवळील घोडसगाव परिसरात घडला आहे. या अपघातासंदर्भातील माहितीला पोलीस सूत्रांनी दुजोरा दिला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुधाचा एक टँकर रस्त्यावर बंद पडलेला होता. त्यामुळे त्या बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध टाकण्याचे काम सुरू होतं. याच वेळी दुधाचा टँकर आणि क्रेनला भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिली. त्यात 5 जण ठार झाले आहेत. मृतांची नावे अद्याप कळू शकलेली नाही. घटनास्थळी मुक्ताईनगर पोलीस दाखल झाले असून, पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. मृतांमध्ये काही मजुरांचा समावेश असल्याचे समजते.
 

Web Title: A tragic accident near Muktainagar; 5 killed as truck hits milk tanker