पत्नीच्या विरहामुळे ३६ वर्षीय तरुणाने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 16:58 IST2023-03-25T16:57:43+5:302023-03-25T16:58:16+5:30
नीलेशचे वडील सुकलाल शंकर भोई (७०) यांनी फिर्याद दिली

पत्नीच्या विरहामुळे ३६ वर्षीय तरुणाने संपवले जीवन
वरणगाव (जि. जळगाव) : पत्नीच्या विरहामुळे पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वरणगाव (ता. भुसावळ) येथे शुक्रवारी रात्री घडली. नीलेश सुकलाल भोई (३६, रा. रामपेठ, वरणगाव) असे या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. नीलेश याच्या पत्नीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे तो नैराश्येत होता. यातून त्याने शुक्रवारी रात्री घरात कुणीच नसल्याची संधी साधली. छताच्या पंख्याला रुमालाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
नीलेशचे वडील सुकलाल शंकर भोई (७०) यांनी फिर्याद दिली. त्यावरून वरणगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नीलेशच्या पत्नीचे निधन झाले असल्यामुळे त्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्याच्या पश्चात आजी, आई, वडील, मुलगा असा परिवार आहे. पुढील तपास सपोनि आशिषकुमार अडसूळ व उपनिरीक्षक परशुराम दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.