अवैध वाळू उपसा करणारे ९ ट्रॅक्टर जप्त; दोन पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:51 AM2019-07-19T11:51:57+5:302019-07-19T11:53:33+5:30

गिरणा नदीपात्रात सुरु होता उपसा : महसूल व पोलीस पथकाकडून कारवाई

9 tractors seized by illegal sand extraction; Two ran out | अवैध वाळू उपसा करणारे ९ ट्रॅक्टर जप्त; दोन पळविले

अवैध वाळू उपसा करणारे ९ ट्रॅक्टर जप्त; दोन पळविले

Next

जळगाव/ धरणगाव : शहर परिसर व जिल्ह्यात अवैध वाळू उपसा सुरूच असून बांभोरी प्र.चा. येथे गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करणारे नऊ ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने जप्त केले तर दोन ट्रॅक्टर चालकांनी पळवून नेले. जप्त ट्रॅक्टर धरणगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून एकेका ट्रॅक्टरला एक लाख ३५ हजाराची नोटीस बजावण्यात आली आहे. प्रांताधिकारी, धरणगावचे तहसीलदार, जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी स्वत: नदीपात्रात उतरून दंगा नियंत्रण पथकाच्या बंदोबस्तात ही कारवाई केली. दोन आठवड्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे.
ठेकेदारांचीच तक्रार
वाळू लिलावामध्ये या गटाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांनीच बांभोरी नजीकच्या गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची तक्रार धरणगाव तहसील कार्यालयात केली होती. सोबतच परिसरातील नागरिकांच्याही तक्रारी होत्या. त्यानुसार गुरुवार, १८ जुलै रोजी सकाळी सात वाजताच प्रांताधिकारी विनय गोसावी, धरणगावचे तहसीलदार मिलिंद कुलथे, प्रशिक्षणार्थी तहसीलदार अभिजित जाधव, नायब तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी. कोतवाल यांचे पथक बांभोरी, ता. धरणगाव येथील सिद्धी विनायक नगर शेजारी गिरणा नदी पात्रात पोहचले असता तेथे ११ ट्रॅक्टरव्दारे वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले.
दोन ट्रॅक्टर पळविले
महसूलचे पथक नदी पात्रात पोहचताच त्यांना पाहून चालकांनी एम.एच. १९, एएन - १९६२ व एमएच. १९, पी. ०३९२ हे दोन वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेले. मात्र उर्वरित ९ ट्रॅक्टर या पथकाने ताब्यात घेतले. त्या सर्वांचा पचंनामा करून ते धरणगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. यामध्ये एमएच. १९, पी. ६५६९, एमएच. १९, बीजी - ५८९९, एमएच. १९, सीजे- ०९३७, एमएच. १९, बीजी- ८७६२, एमएच. १९, बीजी ४३६९, एमएच. १९, बीजी ९०७६, एमएच. १९, बीजी २७५५ व एक विना क्रमांकाचे हिरव्या रंगाच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे.
जळगावातून दंगा नियंत्रण पथक रवाना
गिरणा नदी पात्रात वाळू उपसा सुरू असल्याची माहिती या पथकाने अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना दिली. त्यानंतर या विषयी गाडीलकर यांनी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना पोलीस बंदोबस्ताविषयी कळविले. त्या वेळी डॉ. उगले यांनी जळगावातून दंगा नियंत्रण पथक नदीपात्रात पाठविले. सोबतच जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण हे देखील तेथे पोहचले. पोलीस बंदोबस्तामुळे वाळू चोरट्यांना कोणताही विरोध करता आलानाही.
प्रत्येकी १ लाख ३५ हजाराचा दंड
जप्त करण्यात आलेल्या नऊ ट्रॅक्टरमधील प्रत्येक ट्रॅक्टरला १ लाख ३५ हजार दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.
धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल
दोन ट्रॅक्टर पळवून नेल्या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात तहसीलदार कुलथे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विदगावनंतर पुन्हा मोठी कारवाई
अवैध वाळू उपशाची तीन आठवड्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. या पूर्वी १ जुलै रोजी विदगाव येथे तापी नदी पात्रातून वाळू भरणाºया ९ ट्रॅक्टरवर कारवाई करीत ते घेऊन महसूलचे कर्मचारी येत असताना त्यातील सहा ट्रॅक्टरच्या मालक व चालकांनी पथकातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करून त्यांना ढकलून दिले व ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. त्या वेळी कारवाई करीत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ३ जुलै रोजी वाळू उपसा करणाºयांना रोखण्यासाठी ग्रामस्थ थेट गिरणा नदी पात्रात उतरले होते. त्यावेळी वाळू उपशास विरोध करीत वाळूने भरलेले विना क्रमांकाचे एक ट्रॅक्टर पकडून नदीपात्रातून गावाकडे आणत असताना वाळू वाहतूकदार ट्रॅक्टर घेऊन पसार झाले होते.

Web Title: 9 tractors seized by illegal sand extraction; Two ran out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.