शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

५ जी-नवीन तंत्रज्ञान बदल घडवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 6:06 PM

५ जी-नवीन तंत्रज्ञान बदल घडवणार असून, टेलिकॉमच्या क्षेत्रात भारत दुसºया क्रमांकावर असल्याचे मत कम्युनिकेशन विषयाचे शिक्षक व प्रोसेसर तज्ज्ञ प्रा.धीरज पाटील यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देदूरसंचार दिनानिमित्त कार्यशाळाटेलिकॉमच्या क्षेत्रात भारत दुसऱ्या क्रमांकावर

भुसावळ, जि.जळगाव : ५ जी-नवीन तंत्रज्ञान बदल घडवणार असून, टेलिकॉमच्या क्षेत्रात भारत दुसºया क्रमांकावर असल्याचे मत कम्युनिकेशन विषयाचे शिक्षक व प्रोसेसर तज्ज्ञ प्रा.धीरज पाटील यांनी व्यक्त केले.शहरातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅड टेलिकॉम विभागात शनिवारी आयोजित ५ जी तंत्रज्ञानावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.टेलिकॉमचा कल्पनातीत वेग चक्रावून टाकणारा आहे. शिवाय हा वेग प्रत्येक दशकात किंबहुना प्रत्येक वर्षी वाढत चालला आहे. पूर्वी एखादा बदल होण्यास १० वर्षे लागत असतील तर तोच बदल आता १ वर्षांत होतो. स्मार्टफोनसारखी सुविधा त्यांनी अतिशय कमी काळात आत्मसात केली आहे. जगात टेलिकॉमच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. या बदलांचा स्वीकार भारताने केला आहे. त्याचप्रमाणे टेलिकॉम क्षेत्राला लागणाºया पायाभूत सुविधा येथे इतर देशांपेक्षा जास्त आहेत. म्हणूनच भारत हा टेलिकॉमच्या क्षेत्रात चीन नंतर दुसºया क्रमांकावर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी फोन्समध्ये वापरल्या जाणाºया ५ जी तंत्रज्ञानचा एक भाग क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसरवर मार्गदर्शन केले, तर नवीन तंत्रज्ञानामुळे होणारे बदल व फायदे प्रा.गजानन पाटील यांनी सांगितले.दोन सत्रात चाललेल्या या कार्यशाळेत महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकॉम विभागातील विभागप्रमुख डॉ.गिरीश कुळकर्णी, प्रा.अनंत भिडे, प्रा.धीरज अग्रवाल, प्रा.गजानन पाटील, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.दीपक साकळे, प्रा.धीरज पाटील, नितीन पांगळे ह्या आठ तज्ञ प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.नवीन तंत्रज्ञानाचे फायदे : प्रा.गजानन पाटीलटेलिकॉम क्षेत्राने लोकांना इंटरनेटच्या माध्यमातून जवळ आणले आहे. आता छोट्या गावातील व्यापाºयाचे जगभर ग्राहक आहेत आणि ते आॅनलाइन उत्पादनांची विक्री करीत आहेत. छोट्या गावातील लोक विशेषत: ब्रॅण्डच्या गुणवत्ता उत्पादनांचे आॅर्डर करू शकतात जे त्यांच्या क्षेत्रात उपलब्ध नाहीत. अगदी लहान व्यापारी, हस्तकला व्यापारी, स्थानिक सेवा प्रदाते स्वत:साठी, बाजार शोधण्यासाठी व्हॉट्सअप, हाइक, फेसबूक इत्यादी मोबाइलचा वापर वापरतात. या नवीन तंत्रज्ञानामुळे ई-कॉमर्स, बीपीओ आणि व्यवसाय संधी वाढविण्यासारख्या उद्योगांच्या निर्मितीत वेगाने वाढ होईल.महामार्ग, सर्वत्र मोबाईल कनेक्टिव्हिटी, सार्वजनिक इंटरनेट प्रवेश कार्यक्रम, ई-शासन, ई-क्रांती (ज्याचा उद्देश इलेक्ट्रॉनिक सेवा देण्यासाठी आहे), सर्व माहिती क्षणात उपलब्ध होईल व या सर्व क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढतील, अशी माहिती प्रा.गजानन पाटील यांनी दिली.

टॅग्स :Educationशिक्षणBhusawalभुसावळ