जळगावात ५४ हजाराची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 14:03 IST2018-08-01T14:03:38+5:302018-08-01T14:03:52+5:30

जळगावात ५४ हजाराची घरफोडी
जळगाव : आरटीओ कार्यालयाच्या परिसरातील मनिषा कॉलनीत गोकुळ पंढरीनाथ पाटील यांच्या बंद घराचे कुलुप तोडून साडे पाच हजार रुपये रोख व दागिने असा ५३ हजार ७०० रुपयांचे ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.
गोकुळ पाटील यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावयची असल्याने ते पत्नीसह १६ मे रोजी पुणे येथे मुलाकडे गेले होते. सोमवारी शेजारी राहणाऱ्या सिमा पाटील यांनी फोन करुन घर उघडे असून चोरी झाल्याची माहिती दिली. पाटील यांनी आदर्श नगरातील भाऊ कृष्णराव पाटील यांना घरी पाठविले. त्यांनी घरात जाऊन पाहिले चोरी झाल्याचे समजले. सोन्याचे दागिने व साडे पाच हजार रुपये रोख असा ऐवज चोरी झाला आहे.