शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

५२३ विद्यार्थ्यांनी अजूनही केले नाही प्रवेश निश्चित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई प्रवेशांसाठी लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चितीची अंतिम मुदत उद्यावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई प्रवेशांसाठी लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चितीची अंतिम मुदत उद्यावर येवून ठेपली आहे. मात्र, अजूनही ५२३ विद्यार्थ्यांनी शाळांमध्‍ये जावून आपले प्रवेश निश्चित केलेले नसल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, मुदत संपल्यानंतर लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना कुठलीही संधी मिळणार नसून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, म्हणजेच शिक्षण हक्क कायद्यानुसार, २५ टक्के जागांवरील प्रवेश निश्चितीसाठी ३१ जुलै ही मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने झाली होती. अजूनही ज्या पालकांनी शाळांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित केलेला नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन करण्‍यात आले आहे. दुसरीकडे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सुरू होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला आहे. तरीदेखील गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही आरटीई प्रवेशाच्या प्रक्रियेला विलंब झालेला आहे.

अशा आहेत जागा...

जळगाव जिल्ह्यातील २९६ शाळांमधील ३ हजार ६५ जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या जागांसाठी जिल्हाभरातून ५ हजार ९३९ अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. त्यापैकी २ हजार ६९५ विद्यार्थ्यांना ऑनलाइन लॉटरी लागली होती. या विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत प्रवेश निश्चितीची मुदत देण्‍यात आली होती.

आतापर्यंत २१७२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

लॉटरी लागलेल्या २ हजार ६९५ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत २ हजार १७२ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये जावून आपले प्रवेश निश्चित केले आहे. परंतु, प्रवेश निश्चितीची अंतिम मुदत ही उद्यावर येवून ठेपलेली असताना, अजूनही ५२३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळांमध्ये जावून प्रवेश निश्चित केलेले नाही. दरवर्षी आरटीई प्रवेशाच्या जागा रिक्त राहतात. यंदाही ही परंपरा कायम राहिल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.