शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वडजी शाखेत ६२ लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 22:37 IST

तत्कालीन व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा : वार्षिक परीक्षणात अपहार उघडकीस

भडगाव : तालुक्यातील वडजी येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत वार्षिक परीक्षण सुरू असताना बँकेचा तत्कालीन व्यवस्थापकाने ६२ लाख ५१ रुपयांचा शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत तत्कालीन व्यवस्थापकाविरूद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, अंकित कैलास अग्रवाल (चार्टर्ड अकौंटंट, रा. बन्सीलाल नगर औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वडजी येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक मनोज प्रभाकर भोसले याने वडजी बँक शाखेत जुलै २०१७ ते आॅगस्ट २०१८ दरम्यान शाखेतील कापूस अनुदान, संजय गांधी निराधार अनुदान, बोंड अळी अनुदान, तसेच रीबीटच्या रकमा, इतर कर्ज, डिफ्रन्स खाते, ओव्हरड्यूस, एफडी, ब्रांच अ‍ॅड्जस्टमेंट खाते व इतर खाते जमा असलेल्या रकमा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी स्वत:च्या व आपल्या नातेवाईक व परिचितांच्या खात्यात हस्तांतरित केल्या. तसा अपहार तयार करण्याच्या दृष्टीकोनातून चुकीचा हिशेब करून शाखेचा व्यवहारात नोंदी घेतलेल्या आहेत, असे २५ ते २७ आॅगस्ट २०१९ दरम्यान वार्षिक परीक्षणात लक्षात आले. मनोज भोसले याने या काळात एकूण ६२ लाख ५१ रुपयांचा अपहार केला आहे.अंकित अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोज प्रभाकर भोसले रा.पाचोरा याच्याविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आनंद पठारे हे करीत आहेत.