चोपडा स्थानकावर महिलेच्या पर्समधून ८६ हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 21:21 IST2019-08-19T21:21:35+5:302019-08-19T21:21:53+5:30

चोपडा : येथील स्थानकावर बसमध्ये चढताना गणपूर येथील महिलेच्या पर्समधील ८६ हजार रुपये काढून पोबारा केला. हा घटना १९ ...

 3,000 lumps from a woman's purse | चोपडा स्थानकावर महिलेच्या पर्समधून ८६ हजार लंपास

चोपडा स्थानकावर महिलेच्या पर्समधून ८६ हजार लंपास



चोपडा : येथील स्थानकावर बसमध्ये चढताना गणपूर येथील महिलेच्या पर्समधील ८६ हजार रुपये काढून पोबारा केला. हा घटना १९ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
तालुक्यातील गणपूर येथील रहिवासी रत्ना कैलास पाटील (वय ३५) यांनी स्वत:कडील सोन्याचे दागिने चोपडा पीपल बँकेत गहाण ठेवून ८६ हजार रुपये शेतीकामासाठी कर्ज घेतले होते. सदर रक्कम स्वत:कडील पर्समध्ये ठेवली. घरी परत जाण्यासाठी येथील बस स्थानकावर येऊन थांबल्या. काही वेळाने ठेवून बस स्थानकावर येऊन गणपूर बसमध्ये चढत असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने पर्स मधील रोख ८६००० रुपये काढून पोबारा केल्याची घटना १९ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
 

 

Web Title:  3,000 lumps from a woman's purse