यावलला १९ वर्षीय युवतीची, गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 13:31 IST2021-10-03T13:30:15+5:302021-10-03T13:31:46+5:30
मुलीचे वडील भैरवलाल बगदीराम प्रजापती यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यावलला १९ वर्षीय युवतीची, गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव: यावल येथील फालक नगरमधील रहिवासी पूजा भैरवलाल प्रजापती (१९) या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी साडेसात वाजता उघडकीस आली. युवतीचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. यानंतर तिचा मृतदेह चितोडगढ (राजस्थान) येथे मूळगावी नेण्यात येणार आहे.
मुलीचे वडील भैरवलाल बगदीराम प्रजापती यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस अमलदार नेताजी वंजारी हे करीत आहे. भैरवलाल प्रजापती हे गेल्या २० वर्षांपासून यावल येथे भेळपूरी विक्रीचा व्यवसाय करतात. यावल येथे ते स्थायिक झाले आहेत. या तरूणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.