जळगाव जिल्ह्यात 1 लाख 61 हजार रुग्णांचे मुख स्वास्थ अस्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:43 AM2017-12-29T11:43:48+5:302017-12-29T11:48:06+5:30

शनिवारी मोहिमेचा समारोप

1 lakh 61 thousand patients in Jalgaon district is unhealthy | जळगाव जिल्ह्यात 1 लाख 61 हजार रुग्णांचे मुख स्वास्थ अस्वच्छ

जळगाव जिल्ह्यात 1 लाख 61 हजार रुग्णांचे मुख स्वास्थ अस्वच्छ

Next
ठळक मुद्देमुख स्वास्थ तपासणीत आढळला कर्करोग रुग्णजिल्हा रुग्णालयात मोफत तसापणी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29-   शासनाच्या राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरात राबविण्यात येत असलेल्या मुख स्वास्थ तपासणी मोहिमेंतर्गत 27 डिसेंबर्पयत जिल्हाभरात 8 लाख 71 हजार 632 जणांची तपासणी करण्यात आली असून यातील 1 लाख 61 हजार रुग्णांचे मुख्य स्वास्थ अस्वच्छ आहे.  यामध्ये एका जणाला कर्करोग असल्याचे आढळून आले आहे. या मोहिमेचा 30 डिसेंबर रोजी समारोप होत आहे. 
या संदर्भात गुरुवारी जिल्हा रुग्णालयात पत्रपरिषद होऊन या विषयी माहिती देण्यात आली. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, दंत शल्य चिकित्सक डॉ. संपदा गोस्वामी,  जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार  डॉ. नितीन भारती, मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी आदी उपस्थित होते. 
या तपासणी मोहिमेंतर्गत शासकीय कार्यालयांमधील  30 वर्षे वयावरील नागरिकांच्या मौखिक तपासणी शिबिराचे 1  डिसेंबरपासून आयोजन  करण्यात आले होते.  
एका जणाला आढळला कर्करोग
जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आलेल्यांपैकी एका जणाला जीभेचा कर्करोग असल्याचे या मोहिमेतून समोर आले आहे. अशाच प्रकारे जिल्हा रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण कक्षात नेहमी नागरिकांची तपासणी केली जाणार असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले. 
1774 जण जिल्हा रुग्णालयात
जिल्ह्यात मुख स्वास्थाची तपासणी केलेल्या 8 लाख 71 हजार 632 जणांपैकी तब्बल एक लाख 61 हजार 191 जणांचे मुख स्वास्थ अस्वच्छ असल्याचे आढळून आले आहे. तपासणीतील 64 हजार 842 जणांना दारुचे, एक लाख 32 हजार 186 जणांना तंबाखू, सुपारीचे व्यसन असल्याचे दिसून आले. सात लाख 9 हजार 539 जणांचे मुख स्वास्थ स्वच्छ असून 8 हजार 513 जणांना व्यसनामुळे तोंड उघडता येत नसल्याचेही समोर आले आहे. 4191 जणांच्या मुखात पांढरे, लाल चट्टे असून 1494 जणांची जीभ जाडसर झाली आहे. यात 403 जणांमध्ये 15 दिवसांपेक्षा जास्त दिवसानंतरही बरा न होणारा व्रण आढळून आला. यामध्ये कर्करोगाच्या निदानासाठी तपासणी आवश्यक असलेल्या 1774 जणांना जिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात आल्याचे डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयात मोफत तसापणी
या मोहिमेंतर्गत जिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात आलेल्यांची तसेच नव्याने येणा:यांची जिल्हा रुग्णालयात कर्करोग तज्ज्ञ डॉ.नीलेश चांडक हे मोफत तपासणी करीत असून याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ.चव्हाण यांनी केले. 
या मोहिमेचा 30 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा रुग्णालयात समारोप होणार आहे. या वेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार  आहे. 

Web Title: 1 lakh 61 thousand patients in Jalgaon district is unhealthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.