जि.प.च्या शाळेचे पत्रे कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:27 IST2019-01-13T00:27:33+5:302019-01-13T00:27:50+5:30

भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्गखोल्यावरील पत्रे कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली.

ZP School's letters collapsed | जि.प.च्या शाळेचे पत्रे कोसळले

जि.प.च्या शाळेचे पत्रे कोसळले

पारध : भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्गखोल्यावरील पत्रे कोसळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, शाळा सुटल्यानंतर ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला.
पारध खूर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची स्थापना १९६० मध्ये झाली होती. येथे इयत्ता पहिली ते आठपर्यंतचे १३४ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळेत आठ वर्गखोल्या आहे. या सर्वच वर्गखोल्या मोडकळीस आल्या होत्या. दरम्यान, शुक्रवारी साडेचार वाजेच्यासुमारास शाळा सुटल्यानंतर या शाळेतील दोन वर्गखोल्यावरील पत्रे अचानक कोसळली.

Web Title: ZP School's letters collapsed