दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:58 IST2018-10-14T00:57:04+5:302018-10-14T00:58:08+5:30
सत्तेत येण्यापूर्वी भाजपा सरकारने मोठ-मोठी आश्वासने दिली, परंतु एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ केली. जनतेला खोटी आश्वासने देऊन भाजपा सत्ते आले आहे. याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसच्यावतीने शनिवारी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना गाजर देऊन सरकारचा निषेध केला.

दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सत्तेत येण्यापूर्वी भाजपा सरकारने मोठ-मोठी आश्वासने दिली, परंतु एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ केली. जनतेला खोटी आश्वासने देऊन भाजपा सत्ते आले आहे. याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसच्यावतीने शनिवारी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना गाजर देऊन सरकारचा निषेध केला.
यावेळी भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करुन, राज्य व केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ करुन मोदी सरकार जनतेची लूट करीत असून, ही लुट त्वरीत थांबवावी नसता, तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवक कॉग्रेसचे विधानसभा अध्यक्ष देवराज डोंगरे यांनी दिला आहे.
याप्रसंगी उपाध्यक्ष शेषराव जाधव, रवींद्र गाढेकर, सईद शेख, अॅड. संजय खडके, वशी अनुभाई शेख, शेख नाविक, अॅड. दिनेश खरात, अॅड. अभिजित पवार, अॅड. विशाल वाघमारे, विशाल राठोड, राहुल म्हस्के, अविनाश शेळके, रतन बावणे, रतन डोंगरे, आकाश काळूके, अर्जुन पवार, गणेश साबळे, अंकुश पाटोळे यांच्यासह कार्यकत्यांची उपस्थिती होती.