शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींच्या स्वराज्यातील मावळ्यांप्रमाणे तरुणांनी जगणे स्वीकारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST

भोकरदन : छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य हे अठरापगड जातींना बरोबर घेऊन चालणारे आहे. परस्त्री ही मातेसमान असल्याचे संस्कार ...

भोकरदन : छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य हे अठरापगड जातींना बरोबर घेऊन चालणारे आहे. परस्त्री ही मातेसमान असल्याचे संस्कार देणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या स्वराज्यात आपण जगत आहोत. या राज्यात या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक तरुणाने छत्रपतींच्या स्वराज्यातील मावळ्यांप्रमाणे ताठ मानेने जगणे स्वीकारावे, असे प्रतिपादन शिवव्याख्याता, कीर्तनकार शिवलीला पाटील बार्शीकर यांनी केले.

भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव येथे शिवजयंतीनिमित्त अखिल भारतीय महिला वारकरी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यअध्यक्षा कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय देवरे, गजानन गाढे, विशाल गाढे यांची प्रमुख उपस्थिती होती. आजचे तरुण हे दिशाहीन होत चालले आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील तरुण हा व्यसनाकडे वळाला आहे. केवळ शिवजयंतीच्या कार्यक्रमातून शिवाजी महाराजांवरील प्रेम न दाखवता त्यांच्या स्वप्नातील स्वराज्य घडवण्यासाठी युवकांनी एक आदर्श नागरिक तयार होणे काळाजी गरज आहे. छत्रपतींचे स्वराज्य हे अख्ख्या जगात आदर्श आहे. मग त्या राज्यातील मावळा हा सर्वच संस्कृतीसाठी वरचढ आहे. असे असताना पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करून छत्रपतींच्या स्वराज्याला बदनाम करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी टाळकरी सेवेसाठी ज्ञानेश्वर माऊली लिंगेवाडीकर, प्रकाश महाराज लिंगेवाडीकर, नितीन महाराज शिंदे बेल्होरा, प्रकाश महाराज शिंदे लिंगेवाडीकर, अर्जुन महाराज देवरे, शंकर महाराज राऊत, प्रमोद महाराज सहाणे निमगांव, सांडू पाटील राऊत, प्रल्हाद बनसोडे, चोपदार राजू महाराज शिरसाठ यांनी साथ दिली. कार्यक्रमासाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हादी चाऊस, उपाध्यक्ष समाधान काळे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थानी परिश्रम घेतले.

चौकट

महिलांनी मालिकांवर नव्हे तर मुलांवर लक्ष द्यावे

आजच्या महिला या मालिका अन् चित्रपटाकडे वळाल्या असून, बालकांवर करावयाचे संस्कार ही बाब विसरुन गेल्या आहेत. महिलांनी मालिका न बघता आजचा मुलगा हा भविष्यातील चांगला नागरिक कसा होईल ? यासाठी काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.