विद्युत खांब अंगावर पडून मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 00:04 IST2020-03-08T00:04:24+5:302020-03-08T00:04:34+5:30

ट्रॅक्टरमध्ये विजेचे खांब भरताना खांब अंगावर पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला.

 Worker's death after falling on electric pole | विद्युत खांब अंगावर पडून मजुराचा मृत्यू

विद्युत खांब अंगावर पडून मजुराचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : ट्रॅक्टरमध्ये विजेचे खांब भरताना खांब अंगावर पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले. ही घटना भोकरदन तालुक्यातील लोणगाव शिवारात शनिवारी दुपारी घडली. घटनेची राजूर पोलीस चौकीमध्ये नोंद करण्यात आली आहे. जखमींवर जालना येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
संतोष उत्तमराव राठोड (३६ रा. जैतपूर ता. जि. जालना) असे मयताचे नाव आहे. लोणगांव परिसरातील कृषीपंपासाठी १६ के. व्ही. ट्रान्सफार्मर बसवण्याचे काम सुरू आहे. लोणगांव येथील जिल्हापरिषद शाळेच्या प्रांगणात कंत्राटदाराने वीजपुरवठ्याच्या खांबांची साठवणूक केली होती. काही मजूर शानिवारी दुपारी हे विद्युत खांब ट्रॅक्टरमध्ये भरत होते. मात्र, त्याचवेळी एक खांब अंगावर पडल्याने संतोष राठोड या मजुराचा मृत्यू झाला. तर इतर दोन मजूर जखमी झाले. जखमींवर राजूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी जालन्याकडे पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच राजूर पोलीस चौकीचे सहायक फौजदार शंकर काटकर, गणेश मांटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी राजूर चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title:  Worker's death after falling on electric pole