कपडे धुण्यास गेलेल्या विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 17:16 IST2019-02-05T17:12:45+5:302019-02-05T17:16:35+5:30
कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका विवाहितेचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील उटवद येथे आज सकाळी घडली.

कपडे धुण्यास गेलेल्या विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू
उटवद (जालना ) : कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका विवाहितेचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील उटवद येथे आज सकाळी घडली. अयोध्या पांडूरंग पांडूळे (२६) असे मृत महिलेचे नाव आहे.
परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. महिलांना पिण्याच्या पाण्यासह कपडे धुण्यासाठी शेतातील विहिरीवर जावे लागते. अयोध्या पांडूळे या आज सकाळी शेतकरी दिलीप गोविंद शिंदे यांच्या शेतातील विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी पाणी शेंदत असताना तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या. यात पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी मौजपूरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घात की अपघात या विषयी तपास करण्यात येत असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक मेहेत्रे यांनी सांगितले.