हिवाळ््यातच जालना जिल्ह्याची टँकरवर मदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:36 IST2018-11-28T00:36:55+5:302018-11-28T00:36:59+5:30
जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच ४१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

हिवाळ््यातच जालना जिल्ह्याची टँकरवर मदार
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात यंदा पाऊस न पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत झपाट्याने घट होत असून, या वर्षी जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यातच ३.४७ मीटरने भूजल पातळीत घट झाली आहे. तर जिल्हाभरातील ८७ पैकी ३१ बोअरवेल नोव्हेंबर महिन्यातच कोरडेठाक पडले आहे. या सर्व परिस्थितीमुळे जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच ४१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात ही परिस्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याची गरज आहे.
यावर्षी पावसाळ््याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात वरुणराजा बरसला. परंतु, त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने शेतक-यांनी लागवड केलेली पिके करपून केली. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच सध्या भूजल पातळीत घट झाल्यामुळे जिल्हाभरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच जिल्ह्यातील ३७ बोअरवेल कोरडेठाक पडले आहे. परिणामी, जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच ४१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येणा-या काळात जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्तक राहण्याची गरज आहे.
जाफराबाद, भोकरदन तालुक्यात सर्वाधिक टँकर
जालना जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये ४१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यात भोकरदन तालुक्यातील १८ गावांमध्ये सवार्धिक २४ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर जाफराबाद तालुक्यातील ११ गावांमध्ये १४ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर बदनापुर तालुक्यात १, अंबड तालुक्यात १ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर जालना, मंठा, परतूर घनसावंगी तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत नाही.
भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ११० विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. या सर्वच विहिंरीमधील भूजल पातळीत झपाट्याने घट झाल्याचे समोर आले. यात भोकरदन तालुक्यातील भूजल पातळीत - ४.६२ मीटरने घट झाली. तर परतूर तालुक्यातील -४.३६, अंबड तालुक्यातील भूजल पातळीत -४.०९ घट झाली आहे.