Video: बायको गेली माहेरी, दारूच्या नशेत तरुणाचा मोबाईल टॉवरवर ठिय्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 11:51 IST2022-07-21T11:51:34+5:302022-07-21T11:51:45+5:30

माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणा या मागणीसाठी केले शोले स्टाईलं आंदोलन

Wife went home, drunk young man stayed on mobile tower demanding to come home | Video: बायको गेली माहेरी, दारूच्या नशेत तरुणाचा मोबाईल टॉवरवर ठिय्या 

Video: बायको गेली माहेरी, दारूच्या नशेत तरुणाचा मोबाईल टॉवरवर ठिय्या 

जालना: माहेरी गेलेल्या बायकोला परत आणण्याच्या मागणीसाठी दारूच्या नशेत तरूणाने ४ तास मोबाईल टॉवरवर शोले स्टाईलं आंदोलन करत ठिय्या दिल्याची घटना बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे बुधवारी घडली. दारूच्या नशेत तरुणखाली येण्यास तयार नसल्याने यंत्रणा हतबल झाली होती.

गणपत बकाल असं दारू पिऊन मोबाईल टॉवरवर चढणाऱ्या तरुणाचं नाव आहे. अचानक गणपत दारूच्या नशेत गावातील मोबाईल टॉवरवर दुपारी ४ वाजेच्या सुमारास चढला. सुरुवातीला ग्रामस्थांनी त्याला खाली येण्याचे आवाहन केले. मात्र, त्याने बायकोला परत आणून द्या म्हणत टॉवरवरच ठिय्या दिला. त्यानंतर त्याची असंबंध बडबड सुरु झाली. 

काही वेळाने मला मला घरकुल पाहिजे, अशी मागणीही तो करू लागला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गणपतला खाली येण्यास सांगतिले. मात्र, पोलिसांकडूनही तो खाली आला नाही. त्यानंतर मात्र अग्नीशमन दलाचे पथक मागविण्यात आले. त्यांनाही गणपतने जुमानले नाही. यादरम्यान ग्रामस्थांनी त्याच्याशी संवाद सुरु ठेवला. अखेर तब्बल 4 तासाने तो टॉवर खाली उतरला. त्यांनतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

Web Title: Wife went home, drunk young man stayed on mobile tower demanding to come home