‘जलयुक्त’चे पाणी मुरतंय तरी कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:46 IST2019-07-29T00:46:22+5:302019-07-29T00:46:44+5:30
दुष्काळावर मात करण्यासाठी शासनातर्फे मागील चार वर्षांत साडेतीन कोटी रूपयांपेक्षा अधिक पैसा खर्च करून जिल्हाभरात जलयुक्त शिवाराची कामे करण्यात आली आहेत. असे असले तरीही शुक्रवारपर्यंत ३५६ टँकरद्वारे जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविण्यात येत आहे.

‘जलयुक्त’चे पाणी मुरतंय तरी कुठे?
विकास व्होरकटे । लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दुष्काळावर मात करण्यासाठी शासनातर्फे मागील चार वर्षांत साडेतीन कोटी रूपयांपेक्षा अधिक पैसा खर्च करून जिल्हाभरात जलयुक्त शिवाराची कामे करण्यात आली आहेत. यातून अनेक ठिकाणचा पाणी प्रश्न सुटला असल्याचे शासनातर्फे सांगण्यात येत आहे. मात्र, असे असले तरीही शुक्रवारपर्यंत ३५६ टँकरद्वारे जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविण्यात येत आहे.
भोकरदन तालुका आदर्श
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सर्वात जास्त १३६ गावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामे राबविण्यात आलेली आहेत. सद्य:स्थितीत या तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाल्याने बंधारे ओसंडून वाहत आहेत. यामुळे तालुक्यातील पारध, पिं. रेणुकाई, जळगाव सपकाळ, बोरगाव जहागीर आदी गावांमधील पाणीपातळी वाढल्याने ग्रामस्थांना तुर्तास पाणी प्रश्न मिटला आहे. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
कामे
जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाच्या माध्यमातून विभागात पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, जूने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध/ के.टी. वेअर
दुरुस्ती व नुतनीकरण, जलस्तोत्रातील गाळ काढणे, जलस्तोत्र बळकटीकरण, विहिर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओढे / नाले जोड कामे हाती घेण्यात आली.
जलयुक्तच्या कामामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी थांबले आहे. यातून सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. तसेच विकेंद्रित पाणी साठाही मोठ्या प्रमाणावर वाढला असून, यामुळे भूर्गभातील पाणीपातळीतही लक्षणीय वाढ दिसून येत आहे.
- बी. आर. शिंदे,
जिल्हा कृषि अधीक्षक