अजित पवार यांचं बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. या निधनानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चांनी जोर धरला आहे. गेल्या ४ महिन्यापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. दरम्यान, आता १७ जानेवारी रोजी शरद पवार, अजित पवार, राजेश टोपे, शशिकांत शिंदे यांच्यातील बैठकीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर टोपे यांनी प्रतिक्रिया दिली.
Video: गोविंदबागेतील 'तो' व्हिडिओ समोर; मृत्यूच्या १० दिवसांपूर्वीच शरद पवारांसोबत अजितदादांची चर्चा
जालन्यात पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी ही बैठक पूर्णपणे अनौपचारिक असल्याचे सांगितले. राजेश टोपे म्हणाले की, “आम्ही कृषी प्रदर्शनाला गेलो होतो. त्याच निमित्ताने शरद पवार यांनी अजित पवार यांना नाश्त्यासाठी आमंत्रित केले होते. अजित पवार नाश्त्याला आले आणि त्याच वेळी आमची अनौपचारिक चर्चा झाली. याला औपचारिक बैठक म्हणता येणार नाही.”
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र याव्यात, अशी भावना अनेक नेत्यांची असल्याचे टोपे यांनी सांगितले. “दोन्ही पक्षांची इच्छा आहे की आपण एकत्र राहिले पाहिजे. मी स्वतः शरद पवार साहेबांना ही विनंती केली होती,” असे त्यांनी स्पष्ट केले.
टोपे म्हणाले की, “आम्ही साहेबांना एकत्र राहण्याची विनंती केली होती, यात कोणतीही लपवाछपवी नाही. मात्र सध्या घडलेली चर्चा ही फक्त संवादापुरती मर्यादित होती.” या बैठकीकडे वेगवेगळ्या राजकीय अर्थांनी पाहिले जात असले तरी, ती कोणताही अधिकृत निर्णय घेण्यासाठी नव्हती, असेही टोपे यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
Web Summary : Rajesh Tope clarified that a meeting with Sharad Pawar and Ajit Pawar was informal, occurring during a breakfast invitation related to an agricultural exhibition. He also mentioned many leaders desire the NCP factions to reunite, a sentiment he personally conveyed to Sharad Pawar.
Web Summary : राजेश टोपे ने स्पष्ट किया कि शरद पवार और अजित पवार के साथ उनकी मुलाकात अनौपचारिक थी, जो एक कृषि प्रदर्शनी से संबंधित नाश्ते के निमंत्रण के दौरान हुई। उन्होंने यह भी उल्लेख किया कि कई नेता चाहते हैं कि एनसीपी गुट फिर से एकजुट हों, यह भावना उन्होंने व्यक्तिगत रूप से शरद पवार तक पहुंचाई।