शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

स्वखर्चाने मंदिर, मशिद, नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:29 AM

पाणी प्यायल्यानंतर जेव्हा हरण, काळवीटसह अन्य प्राणी उड्या मारत पळतात तो क्षण माझ्या मनाला मोठा आनंद देतो असे, वन्य प्राण्यांचा जीवनदाता म्हणून ओळख निर्माण झालेले अली बीन सईद चाऊस यांनी सांगितले.

गजानन वानखडे।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मनुष्याला तहान लागली तर तो कोणाला आवाज देऊन पाणी मागू शकतो, परंतु मुक्या जनावरांना तहान लागल्यास ते कोणाला पाणी मागणार, हाच विचार मला स्वस्थ बसू देत नव्हता. यामुळे २००२ पासून वन्य प्राण्यांची पाण्याविना होणारी गैरसोय थांबविण्यासाठी मी औद्योगिक परिसरात वन्य प्राण्यांना पाणी पिता येईल, असा खड्डा तयार केला आणि त्यात टँकरचे पाणी टाकून वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय केली. पाणी प्यायल्यानंतर जेव्हा हरण, काळवीटसह अन्य प्राणी उड्या मारत पळतात तो क्षण माझ्या मनाला मोठा आनंद देतो असे, वन्य प्राण्यांचा जीवनदाता म्हणून ओळख निर्माण झालेले अली बीन सईद चाऊस यांनी सांगितले.जूना जालना परिसरात राहणारे ५३ वर्षीय अली चाऊस यांची परिस्थिती बेताचीच आहे. औद्योगिक वसाहतीतील वेगवेगळ्या कंपन्यांना ते टँकरने पाणीपुरवठा करतात. यातून सहा ते सात हजार रुपये मिळतात.यातील दोन ते अडीच हजार रुपयांचे पाणी खरेदी करुन ते वन्य प्राण्यांची तहान भागवितात. यासाठी त्यांनी औद्योगिक परिसरात असलेल्या वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांना पाणी पिता येईल असा खड्डा खोदून त्यात प्लास्टिकची पन्नी टाकून वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय केली आहे.गेल्या २१ वर्षापासून हे काम अविरत करत असल्याने यातून एक वेगळाच आनंद मिळतो, असे अली चाऊस म्हणाले.बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला. त्यामुळेच पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांसह वन्य प्राण्यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याची खंत चाऊस यांनी व्यक्त केली. पर्यावरणाचा -हास थांबविण्यासाठी सर्वानीच प्रयत्न करण्याचे गरज असल्याचे ते चाऊस म्हणाले. यात माझ्या कुटुंबियांनी सुध्दा मला या कामासाठी नेहमीच सहकार्य करत असल्याने मला हे काम करण्यास बळ मिळते.नागरिकांसाठी पाण्याची मोफत सोयअली चाऊस हे शहरातील नागरिकांना मोफत टँकरचे मोफत पाणी वाटप करतात. यामध्ये शनिमंदिर, इंदिरानगर, चंदनझिरा, इतवारा गल्ली, गणपती गल्ली आदी परिसरातील नागरिकांची तहान भागवितात. याबाबत अली चाऊस यांना विचारले असता. औद्योगिक परिसरात टँकरने पाणी विकून कमाविलेल्या पैशातून अडीच हजार रुपयांचे पाणी मंठा चौफुली परिसरातून विकत घेऊन शहरातील गरजवंत, मंदिर, मशिद तसेच लग्नसमारंभाला मोफत देतो. पाणी मिळाल्याचा नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मला सुध्दा आनंद होत असल्याचे अली चाऊस यांनी सांगितले. जोपर्यंत माझे हातपाय चालेल तोपर्यत हे कार्य अविरत चालू ठेवणार आहे. मोफत पाणी वाटप करुन अली यांनी एक आदर्श निर्माण केला.

टॅग्स :SocialसामाजिकWaterपाणीwildlifeवन्यजीव