पाणीटंचाईचा केळीस फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:47 IST2019-05-23T00:46:52+5:302019-05-23T00:47:58+5:30
वाढते तापमान आणि भीषण पाणी टंचाईचा फटका केळी उत्पादकांना बसला आहे.

पाणीटंचाईचा केळीस फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वाढते तापमान आणि भीषण पाणी टंचाईचा फटका केळी उत्पादकांना बसला आहे. परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव येथे २०० हेक्टरवरील ३० हजारापेक्षा अधिक केळीची झाडे करपली आहेत. सध्या स्थितीत येथील विहिरींनी व बोअरने तळ गाठला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ््यांदेखत केळीचे पीक करपत चालले आहे.
प्रशासनाकडून अद्यापही वरिष्ठांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव येथे जवळपास २०० हेक्टरवर ३० हजारापेक्षा अधिक केळीची झाडे शेतक-यांनी लावलेली होती. मात्र वाढते तापमान आणि भूगर्भातील घटलेली पाणी पातळी यामुळे परिसरातील केळीच्या बागा धोक्यात आल्या असून शेतकरी हतबल झाला आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.