वाढोणा गावाला ‘वॉटर कप’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:54 IST2019-08-12T00:54:14+5:302019-08-12T00:54:56+5:30

पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात प्रथम आलेल्या वाढोणा गावाला पुणे येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात आले

'Water Cup' Award for Wadhona Village | वाढोणा गावाला ‘वॉटर कप’ पुरस्कार

वाढोणा गावाला ‘वॉटर कप’ पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात प्रथम आलेल्या वाढोणा गावाला पुणे येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
पुणे बालेवाडी येथील छत्रपती क्रिडा संकुल बालेवाडी येथे अभिनेता अमीर खान, किरण राव, सत्यजित भटकळ, दिग्दर्शक नागराज मंजुळे, प्रसिध्द संगीतकार अजय-अतुल यांच्यासह चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलावंतांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
जाफराबाद तालुक्यातील वाढोना गावाला प्रथम, चापनेर गावाला द्वितीय तर बेलोरा गावास तृतीय पुरस्कार मिळाला. पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यातील ७६ तालुक्यातील सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ, शासकीय अधिकारी सहभागी झाले होते.

Web Title: 'Water Cup' Award for Wadhona Village