परतूर नगर पालिकेचे लाखो लिटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:42 IST2018-10-01T00:41:12+5:302018-10-01T00:42:05+5:30
लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून, पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

परतूर नगर पालिकेचे लाखो लिटर पाणी वाया
शेषराव वायाळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : शहराला होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेच्या दोन ‘एअर वॉल’ ला गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून, पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. शहरात मात्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
परतूर शहरास पाणी पुरवठा करणाºया जल वाहिनीवरील एअर वॉलला मागील दोन महिन्यापासून गळती लागली आहे. या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. विशेष म्हणजे या पाण्याचे शुध्दीकरण करण्यात आले आहे. शुध्द केलेले पाणी, विजेचा वापर व दुष्काळात या पाण्याचा अपव्यय हा अत्यंत गंंभीर प्रकार आहे. मात्र या प्रकाराकडे नगरपालिका दुर्लक्ष करीत आहे. विजेचा खर्च व भविष्यातील पाणी टंचाईचा विचार करून पालिकेने आता चार दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला. त्यामुळे शहरातील जनता पाण्याचा काटकसरीने वापर करीत आहे. मात्र नगरपालिका प्रशासन याला गंभीरतेने घेत नाही. या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे रोडच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. तरी ही गळती तात्काळ थांबवावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, पावसाळ््याचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. परंतु, अद्यापही तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे सध्या तालुक्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे. येणाºया काळात तीव्र पाणीटंचाईला सामोर जावे लागणार आहे. त्यातच सध्या पाण्याची नासाडी होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.