विष्णू पवार यांचे अपघाती निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:31 IST2019-02-11T00:31:05+5:302019-02-11T00:31:16+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विष्णू दौलतराव पवार (५०) यांचा सिंदखेडराजा -दुसरबीड मार्गावर रविवारी झालेल्या अपघात मृत्यू झाला.

विष्णू पवार यांचे अपघाती निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विष्णू दौलतराव पवार (५०) यांचा सिंदखेडराजा -दुसरबीड मार्गावर रविवारी झालेल्या अपघात मृत्यू झाला.
मित्राच्या मुलाचा विवाह आटोपून मित्रांसोबत ते कारने जालन्याकडे येत होते. त्यांची कार राहेरी गावाजवळ आल्यावर पंक्चर झाल्याने ते गाडीच्या खाली उतरुन रस्त्याच्या बाजूला थांबले होते.
तेवढ्यात भरधाव आलेल्या ट्रक चेचीस (क्र. टाटा ४२२३ टी) ने त्यांना पाठीमागून धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी गणेश भीमराव पाचरने यांच्या फिर्यादीवरुन ट्रक चालक मोहम्मद आरिफ मोहम्मद रशीद (५५, रा. सईदनगर गाझियाबाद, उत्तर प्रदेश) याच्याविरुध्द किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल लोढे करीत आहेत. विष्णू पवार हे १९९४ पासून जालना बाजार समितीचे संचालक होते. त्यांचे वडील दौलतराव पवार हे देखील जालना बाजार समितीचे १९९५ ते १९८१ या काळात उपसभापती होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी जालना येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.