निकृष्ट रस्त्याचे काम ग्रामस्थांनी केले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:58 IST2019-01-16T00:58:09+5:302019-01-16T00:58:39+5:30
घनसावंगी तालुक्यातील लिंबोनी ते तिर्थपुरी या १३ कि.मी. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मंगळवारी रस्त्यावर उतरुन काम बंद पाडले.

निकृष्ट रस्त्याचे काम ग्रामस्थांनी केले बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी/कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील लिंबोनी ते तिर्थपुरी या १३ कि.मी. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मंगळवारी रस्त्यावर उतरुन काम बंद पाडले. जोपर्येत सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गांभिर्याने लक्ष देणार नाही. तोपर्यंत काम सुरु करु देणार नसल्याचा पवित्रा खडका येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.
परिसरातील महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. कोट्यवधी रुपये रस्त्याच्या कामासाठी मंजूर झाले असतांना संबधीत ठेकेदार निकृष्ट साहित्य वापरून रस्त्याचे काम करत आहे. रस्ता जागोजागी उकरला आहे. यावेळी महारुद, जाधव, पद्माकर जाधव, पुरुषोत्तम उढाण, दीपक जाधव आदींची उपस्थिती होती.
दर्जेदार काम होईल : गुत्तेदाराला सूचना
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता बी. बी. निवारे यांनी संबंधित गुत्तेदाराला सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगून दर्जेदार काम करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.