शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांचा वापर; तिघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST

ट्रकची दुचाकीला धडक; दोघे जखमी जालना : रोहिलागड मर्गावर २९ जानेवारी रोजी रात्री भरधव ट्रकने (क्र. एम.एच.२०-एफ.जी. ०४०५) दुचाकीला ...

ट्रकची दुचाकीला धडक; दोघे जखमी

जालना : रोहिलागड मर्गावर २९ जानेवारी रोजी रात्री भरधव ट्रकने (क्र. एम.एच.२०-एफ.जी. ०४०५) दुचाकीला (क्र. एम.एच.२१- बी.एन. ५९१८) जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील रंजित धुंगडे व त्यांची आई जखमी झाली. जखमी धुंगडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सोनवणे हे करीत आहेत.

अंधारात बसलेले दोघे पोलिसांच्या ताब्यात

बदनापूर : तालुक्यातील लोधेवाडी येथील एका किराणा दुकानाच्या सावलीला शुक्रवारी रात्री दोघे बसले होते. त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी सपोउपनि. निवृत्ती शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णा कचरू पवार (रा.डोनवाडा ता.फुलंब्री), सादेक भुरेखा पठाण (रा.फाजलवाडी ता.फुलंब्री) या दोघांविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार हराळकर हे करीत आहेत.

गोठ्यात बांधलेल्या दहा शेळ्यांची चोरी

तळणी : मंठा तालुक्यातील उस्वद येथील सुरेश हरिभाऊ लोमटे यांनी शनिवारी सायंकाळी गोठ्यात २० शेळ्या बांधल्या होत्या. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी १० शेळ्या चोरून नेल्या. या शेळ्यांची किंमत एक लाख १० हजार रुपये असल्याची तक्रार लोमटे यांनी मंठा पोलिसात दिली आहे. हे चोरटे सेनगाव-जिंतूरमार्गे पसार झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेने उस्वद व परिसरातील पशुपालकांमध्ये दहशत पसरली आहे.

जिल्ह्यातील ४३ जणांना कोरोना

जालना : जिल्ह्यातील ४३ जणांचा कोरोना अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला, तर कोरोनामुक्त झालेल्या ४८ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बाधितांमध्ये जालना शहरातील १५ जणांचा समावेश आहे, तर नेर-१, परतूर शहर-१, वाटूर फाटा-२, घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी- १, मानेपुरी- १, अंबड शहरातील ५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोळी शिरसगाव- १, पावसे पांगरी- १, जाफराबाद तालुक्यातील सावंगी-१, वरुड बु.-१, आळंद -१, खामखेडा -१, भोकरदन तालुक्यातील राजूर येथील दोन व बुलडाणा जिल्ह्यातील नऊ जणांना कोरोनाची बाधा झाली.

पोलास गल्लीमध्ये धार्मिक कार्यक्रम

जालना : शहरातील पोलासगल्ली येथील पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री महर्षी मार्कंडेय यांच्या जन्मोत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंदिराचे विश्वस्थ गणेश पोलास, कृष्णा मद्दलवार, लक्ष्मण गोरंट्याल, बालाजी पोलास, लक्ष्मण एक्कलदेव, सतीश पोलास यांच्यासह भाविक उपस्थित होते.

शस्त्र घेऊन फिरणारा पोलिसांच्या ताब्यात

जालना : शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील नर्सिंग वसाहतीत महेश अशोक शिळवणे हा रविवारी दुपारी हातात शस्त्र घेऊन फिरत असल्याची तक्रार महादेव गीते यांनी कदीम ठाण्यात दिली. त्यानुसार, पोलिसांनी तत्काळ कारवाई करून शिळवणेला ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.