वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:09 IST2019-04-01T00:08:58+5:302019-04-01T00:09:06+5:30

अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला.

Two wheeler rider killed in the accident | वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना भोकरदन तालुक्यातील चिंचोली निपाणी पाटीजवळ शनिवारी रात्री आठ वाजता घडली.
भोकरदन तालुक्यातील बामखेडा येथील अरूण फकीरबा काळे (२०) हा तरूण राजूरहून केदारखेड्याकडे मोटारसायकल (क्र. एम. एच. २१, डी. जे. ६८६१) वरून शनिवारी रात्री आठ वाजता जात होता. दरम्यान चिंचोली पाटीजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये अरूण काळे हा खाली कोसळला.
अपघाताची माहिती मिळताच राजूर पोलीस चौकीचे जनार्दन भापकर, संतोष वाढेकर, प्रताप चव्हाण, गणेश मान्टे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला उपचारासाठी जालन्याला हलविले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी राजूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राजूर व परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहनांचा वाढता वेग याला कारणीभूत आहे.

Web Title: Two wheeler rider killed in the accident